वज्रमूठ सभा नव्हती तर मविआत सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा होती; दरेकरांचे टीकास्त्र

वज्रमूठ सभा नव्हती तर मविआत सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा होती; दरेकरांचे टीकास्त्र

उध्दव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सोलापूर : नागपूरमध्ये काल महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. यावेळी दारुचं व्यसन घर उद्ध्वस्त करतं पण सत्तेची नशा देश उद्ध्वस्त करते, अशी टीकेची तोफच उध्दव ठाकरेंनी भाजपवर डागली होती. या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ही वज्रमूठ सभा नव्हती तर महाविकास आघाडीत सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा लागली होती, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

वज्रमूठ सभा नव्हती तर मविआत सफेद झूठ बोलण्याची स्पर्धा होती; दरेकरांचे टीकास्त्र
'पंतप्रधानांचे मौन पुलवामा हल्ला, घोटाळयाचे समर्थन करते'

ही वज्रमूठ सभा नव्हती तर महाविकास आघाडीत सफेद झूट बोलण्याची स्पर्धा लागली होती. उद्धव ठाकरे यांची वैफल्यग्रस्त विधाने पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दिवा विस्थाना ज्याप्रमाणे फडफड करतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचे विधाने होती. महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमुक्त झाल्यात असे बोलले. थापा लावायचे काम ते याठिकाणी करत आहेत. या उलट आमच्या सरकारने भुविकास बँकेचे 700 ते 800 कोटी कर्ज माफ केले. उद्धव ठाकरेंच्या भाषणातून बालिशपणा दिसून आला, अशी खिल्ली प्रवीण दरेकर यांनी उडवली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर मला हसायला येते. सत्ता गेल्यावर माणूस एवढा वैफल्यग्रस्त होतो. उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय दिवे लावले हे सर्वांनी पाहिले. आपण (उद्धव ठाकरे) उलट्या पायाचे होतात म्हणून जनतेने आपल्याला पायउतार केले, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर, उध्दव ठाकरेंनी भाजपला निवडणुकीच्या मैदानात येण्याचे आव्हान दिले होते. यावर बोलताना दरेकर म्हणाले, जनतेने नरेंद्र मोदींना दोन वेळा निवडून दिले. मोदींचा फोटो लावून भाजपसोबत सरकार आणले. आम्ही मुळातच मैदानातले लोक आहोत त्यासाठी वेगळ्या मैदानात येण्याची गरज नाही. तुम्ही आत्ता मातोश्रीतून मैदानात आले. त्यामुळे तुम्हाला मैदानाचे अप्रूप वाटतंय, असे त्यांनी म्हंटले आहे.

शिंदे गटावर बाप चोरणारी औलाद असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जाते. यावरही प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. स्वतःच्या मुलाची काळजी करणाऱ्यांना दुसऱ्याच्या मुलाची काय परवा आहे. जर जनतेच्या मुलांची काळजी असती तर त्यांनी आपल्या मुलाला मंत्री करण्यापेक्षा ग्रामीण भागातील शिवसैनिकाला मंत्री केले असते. ज्यांना मुलाची, भाच्याची, म्हेवण्याची काळजी त्यांनी अश्या गोष्टी करू नयेत. तर, या भाषणात ठाकरे शैलीचा ओढून ताणून आव आणण्याचा प्रयत्न आहे. ठाकरे शैली ही उपजत असावी लागते जी राज ठाकरेंकडे आहे. ठाकरे नाव असल्यामुळे ती शैली आणण्याचा मारून मुटकून प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.

उद्धव ठाकरेंनी घराणेशाही बाबत बोलू नये. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर जगण्याचा प्रयत्न आपण करत आहात. भाषणात राणा भीमदेवी थाटात मनाला माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. मात्र प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा स्वतः जाऊन त्या खुर्चीत बसलात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी योग्य वेळी घराणेशाहीचे उत्तर दिलं, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com