PM Narendra Modi
PM Narendra ModiTeam Lokshahi

'भविष्यात काँग्रेसच्या वाईट परिस्थितीवर जगात अभ्यास होईल' पंतप्रधानांची काँग्रेसवर सडकून टीका

तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
Published by :
Sagar Pradhan

संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार टीका केली. एक दिवस आधी आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारला गोत्यात उभे केले होते. यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे.

PM Narendra Modi
'ईडीचे आभार मानले पाहिजे' पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

विष्यात काँग्रेसवर हार्वर्ड नव्हे तर मोठ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास करावा लागेल

पीएम मोदी म्हणाले की, मी अनेकदा ऐकले आहे. इथल्या काही लोकांना हार्वर्डची मोठी क्रेझ आहे. कोरोनाच्या काळातही असेच म्हटले होते आणि काँग्रेसने म्हटले होते की हार्वर्डमध्ये भारताच्या विनाशावर केस स्टडी होईल. आणि मग काल हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हाऊसमध्ये अभ्यासाबद्दल चर्चा झाली, पण गेल्या काही वर्षांत खूप चांगला आणि महत्त्वाचा अभ्यास झाला. त्याचा विषय होता भारतीय काँग्रेस पक्षाचा उदय आणि अधोगती. मला खात्री आहे की भविष्यात काँग्रेसच्या वाईट परिस्थितीवर हार्वर्ड नव्हे तर मोठ्या विद्यापीठांमध्ये अभ्यास करावा लागेल. काँग्रेसला बुडवणाऱ्यांचाही अभ्यास केला जाणार आहे. अशा लोकांसाठी दुष्यंत कुमारने एक चांगली गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल ये है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं? असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है

राहुल गांधींवर टीका करताना मोदी म्हणाले की, अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली.

PM Narendra Modi
'हा एक नंबर नीच...हल्ला याच्याच लोकांनी घडवला' टीका करत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

काय म्हणाले होते राहुल गांधी?

उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com