वेदांता प्रकल्पाच्या वादामध्ये पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

वेदांता प्रकल्पाच्या वादामध्ये पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याची घोषणा केली आहे. यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत आमचं सरकार येऊन दोनच महिने झालेत असं म्हटलं. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आम्ही राज्यात उद्योग वाढावा यासाठी काम करत आहोत, असेही सांगितले. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सामंजस्य करार भारतामध्ये सेमीकंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ही एक कोटी ५४ लाखांची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक प्रचंड परिसंस्था तयार होईल. याचा फायदा मध्यम आणि लघू उद्योगांना होईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय होता वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प?

वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. यात एक लाख ६३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होती. पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असल्याची प्राथमिक अंदाज होता. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या प्रकल्पासाठी गुजरात सरकारने १ हजार एकर जमीन विनाशुल्क दिली आहे. तसेच वीज व पाणी सवलतीच्या दरात आणि तेही २० वर्षांसाठी एकाच दराने देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Lokshahi
www.lokshahi.com