PM Modi
PM Modi Team Lokshahi

'ईडीचे आभार मानले पाहिजे' पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील.

संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच त्यांनी विरोधीपक्षावर जोरदार टीका केली. एक दिवस आधी आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक प्रश्न विचारले. राहुल गांधी यांनी अदानी मुद्द्यावरून मोदी सरकारला गोत्यात उभे केले होते. यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले आहे.

PM Modi
'कोण राठोड? तो मुलींना पळवून नेणारा राठोड, फालतू...' चंद्रकांत खैरेंची शेलक्या शब्दात टीका

ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है

राहुल गांधींवर टीका करताना मोदी म्हणाले की, अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केली.

ईडीचे आभार मानले पाहिजे की ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही नऊ वर्षांचा काळ पाहिला आहे. त्यांची दिवाळखोरी पाहिली आहे. विधायक टीकेची जागा सक्तीच्या टीकेने घेतली आहे. त्याच्या आवाजात अनेकांनी आपले स्वर मिसळले आहेत - मिले-तेरा मेरा सूर. यामुळे ते एका समान व्यासपीठावर आले नाहीत, पण या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे की ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले आहे. देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले.असा देखील टोला त्यांनी मारला आहे.

PM Modi
'आदित्य ठाकरेंच्या सभेत गोंधळ, दगडफेक नाही' औरंगाबाद पोलिसांचा दावा

काय म्हणाले होते राहुल गांधी?

उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते काय, असा थेट प्रश्न करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com