Narendra Modi
Narendra ModiTeam Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जानेवारीत बेळगाव दौरा

कर्नाटककडून होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती पंतप्रधान मोदींसमोर गाऱ्हाणं मांडण्याची शक्यता.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून गदारोळ सुरु आहे. या वादादरम्यान दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी भेट घेतली होती. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत. त्यामुळे एकच राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Narendra Modi
सुटकेनंतर राऊतांनी घेतली अनिल देशमुखांची भेट; म्हणाले, शत्रूशी असे निर्घृण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावचा दौरा करणार आहेत. सध्या महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या सीमावादावरून मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटककडून होणाऱ्या अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती पंतप्रधान मोदींसमोर गाऱ्हाणं मांडण्याची शक्यता आहे. कारण मोदींच्या भेटीसाठी एकीकरण समितीने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com