'PM मोदींसमोर तोंड उघडण्याची हिंमत फडणवीसांमध्ये नाही'

'PM मोदींसमोर तोंड उघडण्याची हिंमत फडणवीसांमध्ये नाही'

पृथ्वीराज चव्हाण यांची शिंदे सरकारावर घणाघाती टीका

मुंबई : राज्यात डबल इंजिन सरकार आहे. या डबल इंजिन सरकारची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही, असा घणाघात कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर केला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज बैठक आहे. काँग्रेस पक्षात अंतर्गत निवडणूक सुरुवात झाली आहे. प्रदेश प्रतिनिधी निवडून आले आहेत. हा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीतील मतदार आहे. सोनिया गांधी यांचे अभिनंदन करतो. पूर्ण वेळ काँग्रेस अध्यक्ष नाही त्यातही निवडणूक घेण्याची मागणी केली होती. ती विनंती सोनिया गांधी यांनी मान्य केली आहे. यामुळे आता निवडणूक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

वेदांता-फॉक्सफॉन प्रकरणी बोलताना ते म्हणाले, मला दुर्दैवाने सांगावं वाटते कोणताही पंतप्रधान इतका पक्षपातीपणें वागला नसेल. गुजरात पाकिस्तान नाही. पण, राज्यात स्पर्धा असते. आज महाराष्ट्र पुढे गेला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण केले नाही. मोदींना आल्यापासून महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे असून गुजरात महत्व वाढवण्याचे सुरू आहे, अशी टीका चव्हाणांनी मोदी सरकारवर केली आहे.

राज्यात डबल इंजिन सरकार असून महाराष्ट्र नुकसान होते आहे. पालघर प्रोजेक्ट गुजरातला गेला. मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्र करण्याचे स्वप्न होते. अचानक ते अहमदाबादला गेलं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. परंतु, त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही. बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद करावी, असे महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने उद्योजकांनी म्हंटले होते का? मग इतका महाग. प्रकल्प महाराष्ट्र का लादला, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला आहे.

वेदांता प्रकल्पासाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक प्रयत्न करते होते. राज्यात तळेगावात जमीन देणार होते. याशिवाय ३८ हजार कोटी सरकार यांना देणार होते. आता निर्णय होणार असे कळले होते. परंतु, वार फिरले कॅबिनेटमध्ये निर्णय झालं नाही आणि प्रकल्प गुजरात गेला. हा पॅटर्न आहे, असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी समोर तोंड उघडण्याची हिंमत फडणवीस यांच्यात नाही. डबल इंजिन सरकारची मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com