प्रकाश आंबेडकरांना  इंडिया आघाडीत यायचं असेल तर...; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर...; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही. अशातच, पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

अमरावती : ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही. इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. मात्र, वंचितचा इंडिया आघाडीत समावेश होण्याचा मुद्दा रेंगाळला आहे. अशातच, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.

प्रकाश आंबेडकरांना  इंडिया आघाडीत यायचं असेल तर...; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान
Suraj Chavan : सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडी 28 पक्षाची आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटलं पाहिजे किंवा त्यांना एक पत्र लिहिलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी आंबेडकरांनी दिला आहे.

पण, प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहे हे मला माहित नाही मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटायला प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे, असाही सवाल चव्हाणांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे देशातील दलितांचे एक मोठे नेते आहे. त्यांच्याकडे आंबेडकरी नाव आहे. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे, त्यांनी संसदेत आलं पाहिजे. अवास्तव मागणी केली तर फायदा मोदींना होतो. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खासदार पराभूत झाले. त्यांनी फोन करून सांगितलं पाहिजे की मला इंडिया आघाडीत येयचं आहे, असेही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com