...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

Sunil Tingre: पुण्यात कल्याणीनगर इथं शनिवारी रात्री झालेल्या वाहन अपघात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. कल्याणी नगर जंक्शन भागात नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन राजकीय वातावरण देखील तापलं आहे. अपघाताची घटना घडली त्या रात्री सुनील टिंगरे हे पोलीस ठाण्यात गेले होते. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्यावर काही जणांकडून आरोप केले जात आहेत. या सगळ्या घटनेवर आता वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विषयी त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

माझ्या मतदारसंघात घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो. रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी माझ्या पीएचा मला फोन आला की मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्ते असल्याचा माहिती मिळाली. विशाल अग्रवाल यांचा देखील फोन आला की माझ्या मुलाला मारहाण झाली आहे. म्हणून मी पोलिस स्टेशनला पोहचलो. त्यानंतर पोलिसांनी मला माहिती दिली. मी पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करायला सांगितलं. मृतांच्या नातेवाईकांशी देखील मी बोललो. मी पब आणि बारच्या विरोधात नेहमीच भूमिका घेतली आहे. राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याआधी मी अग्रवाल यांच्याकडे नोकरी करायचो. एवढाच त्यांचा आणि माझा संबंध आहे. मृतांच्या नातेवाईकांना मी मदत केली. मी पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज खुले करण्याची मागणी करतो आहे अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com