Mahesh Landge : भाजपाकडून महेश लांडगे यांना धक्का

Mahesh Landge : भाजपाकडून महेश लांडगे यांना धक्का

पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमले आहे. पुणे लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिली होती. भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिकामी आहे.

भाजपने मिशन 2024 ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.जून महिन्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली होती. परंतु आता शिरुरची जबाबदारी महेश लांडगे यांच्याकडून काढून घेतली आहे. महेश लांडगे यांना हा मोठा धक्का समजला जातो आहे.

आता शिरुरची जबाबदारी राजेश पांडे यांच्याकडे दिली आहे.राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com