आदित्य ठाकरे नासमझ आहेत; विखेंचा निशाणा

आदित्य ठाकरे नासमझ आहेत; विखेंचा निशाणा

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका

अहमदनगर : वेदांता प्रकल्पावरुन राजकारण ढवळून निघत आहेत. यावरुन सत्ताधारी-विरोधक समोरा समोर आले असून एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे नासमझ आहेत, राज्याबाहेर उद्योग जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ नगर इथे विखे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

वेदांता उद्योग गुजराथमध्ये गेल्याने टीका करणारे शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प दुसऱ्या राज्यात का गेला याची माहिती घ्यावी तसेच वेदांता बाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल माध्यमांना अवगत केले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे नवीन आणि नासमझ आहेत. त्यांनी आघाडी सरकारच्या काळात राज्यातील नाणार सारखे उद्योग त्यांच्याच नेत्यांमुळे गेलेत हे माहिती करून घ्यावे. हा प्रकार म्हणजे उगाच चोराच्या उलट्या बोंबा मारून पोरकटपणा करण्यासारखे असल्याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीहीआदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही, असा टोला लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com