मविआची वज्रमूठ ढिल्ली; विखे-पाटलांचा घणाघात, जागेसाठी एकमेकांवर मुठ उभारल्याशिवाय राहणार नाहीत

मविआची वज्रमूठ ढिल्ली; विखे-पाटलांचा घणाघात, जागेसाठी एकमेकांवर मुठ उभारल्याशिवाय राहणार नाहीत

कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

संतोष आवारे | अहमदनगर : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मविआच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावरुन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मविआवर घणाघात केला आहे. महाविकास आघाडी वज्रमूठ ढिल्ली झाली असल्याची टीका विखे-पाटलांनी केली आहे.

मविआची वज्रमूठ ढिल्ली; विखे-पाटलांचा घणाघात, जागेसाठी एकमेकांवर मुठ उभारल्याशिवाय राहणार नाहीत
स्वाभिमानीतर्फे पहिले नांगरट साहित्य संमेलन 4 जूनला कोल्हापूरमध्ये : राजू शेट्टी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल हे स्थानिक परिस्थितीनुसार लागले आहेत. त्या निवडणुकीचा आधार घेऊन राज्यातील महाविकास आघाडीचा उत्साह वाढला असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या बाबत राज्यपातळीवर देश पातळीवर आणि पक्ष पातळीवर आत्मचिंतन सुरू आहे. राष्ट्रवादीने कर्नाटकात जे उमेदवार उभे केले होते त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झालं. याबाबत राष्ट्रवादीने विचार केला पाहिजे, असे देखील विखे म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी वज्रमूठ ढिल्ली झालेली आहे. त्यांचा जागा वाटपाबाबत गोंधळ सुरू असून जागेसाठी एकमेकांवर मुठ उभारल्याशिवाय हे राहणार नाहीत. त्यांच ध्येय नेमकं काय आणि खरी टीम कोणती आहे? याबाबतच अजून स्पष्टता नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल आहे.

शिवसेना सारख्या पक्षाची नेमकी विचारधारा काय आहे? देशभक्ती आणि देव भक्तीला त्यांनी आता देशद्रोही ठरवण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे जनता यांच्या पाठीशी राहणार नाही, असं देखील विखे म्हणाले आहेत.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी खंडणी घेतली असेल किंवा पदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना पाठीशी कोणीही घालत नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. वानखेडे यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशी ते जर दोषी आढळले तर त्यांना कोणीही पाठीशी घालणार नाही, असं देखील विखे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com