Rahul Gandhi
Rahul GandhiTeam Lokshahi

भारत जोडो यात्रेचे ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही, राहुल गांधींचा भाजपवर घणाघात

भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा
Published by :
Sagar Pradhan

राहुल गांधींच्या नेत्तृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रातून राहुल गांधी यांच्या या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याच यात्रेदरम्यान आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा पार पडली. या आयोजित सभेमध्ये बोलताना राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा आहे. अशा शब्दात त्यांनी भाजप टीका केली आहे.

Rahul Gandhi
राज्यात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू - आदित्य ठाकरे

राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे?

आज देशात भीती चे वातावरण बीजेपी ने निर्माण केला म्हणून ही यात्रा काढण्यात आली.

ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.

शिवाजी महाराज यांनी जगाला रस्ता दाखविला. शिवाजी महाराज यांना कोण बनवलं महाराज फक्त व्यक्ती न्हवते ते महाराष्टाची आवाज होती. शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनात ही यात्रा सुरू आहे

देशात आज भाजपनं हिंसा, द्वेश आणि दहशत पसरवली आहे. या दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचं ध्येय कुणाला काही समजवायचं नाही. या यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपलं दु:ख समजून घेण्याचा आहे, असं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत मिळाली नाही. देशातील धनाड्या लोकांनाच का कर्जमाफ होतो. जर राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी शेतकऱ्यांचं मनापासून ऐकलं तर निश्चित शेतकऱ्यांना मदत मिळेल. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.

शेतकऱ्यांसोबत युवकही भेटतात. त्यांचे पालक लाखो रुपये भरुन प्रवेश घेतात. इंजिनिअरिंग करतात. मेकनिकल करतात आणि नंतर मजूरी करतात, ओला उबेरवर नोकरी करतात. मुलं लाखो रुपए खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे.

भीती, हिंसा, द्वेषानं तोडलं जातं तर प्रेमानं सर्व जोडलं जातं. भारत जोडोचं ध्येय हे 'मन की बात' करण्यासाठी नाही.

लाख रुपयाच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. लाखाचे कर्ज आमचे माफ होत नाही. उद्योगपतींचे कोटी, अरबो रुपये माफ होतात, असे का?

युपीए असताना, आम्ही विदर्भासाठी कर्जमाफी केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान, प्रेमाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ऐकले तर, कुणीही आत्महत्या करणार नाही. त्यांचा आवाज ऐकला तर, त्यांना मदत होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com