Aditya Thackeray
Aditya Thackeray Team Lokshahi

राज्यात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू - आदित्य ठाकरे

मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच राज्यातील प्रकल्प बाहेरील राज्यात गेल्यामुळे राजकीय वर्तुळात एकदम गोंधळ उडाला होता. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारवर चांगेलच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या कामावरून आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार टीकास्त्र डागले आहे. राज्यात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे. अशा शब्दात त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

Aditya Thackeray
महात्मा गांधींचे पत्र शेअर करत देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना सवाल

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे- फडणवीस सरकार गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, मुंबई महापालिकेत आम्ही प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार कोटीचे टेंडर काढत असतो. टप्प्याटप्प्याने ते काम करत असतो. सर्व रस्त्यांवर एकत्र काम करण्याची कुठेही परवानगी मिळत नाही. हे आम्हाला माहीत होते सरकारला माहीत होतं की नाही माहीत नाही. त्यामुळे हे सरकार खोटं बोलत आहे हे समजत होते. मुंबईत 16 प्लानिंग एजन्सी असतात आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन काम करावे लागते. हे या सरकारला माहीतच नाही,अश्या शब्दात शिंदे फडणवीस सरकारला आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे.

5 हजार कोटींच्या टेंडरमध्ये कोणी आले नाही का? तुमची लोक आली नाही म्हणून टेंडर दिलं नाही का? असा सवाल करतानाच आता मुंबईच्या रस्त्यांचे काय होणार हे कुणालाच माहीत नाही. पाच हजार कोटींच्या रस्ते कामांच्या घोषणेमुळे गेल्यावर्षीची कामे आणि या वर्षीची कामेही सुरू झाली नाहीत. येत्या पावसाळ्यात मुंबई तुंबली तर त्याला जबाबदार कोण? महापौर आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असा गंभीर सवाल आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला केला.

1700 कोटी रुपये मुंबईच्या ब्युटिफिकेशनसाठी जाहीर झाले आहेत. नगरसेवकांचा हा निधी असतो. हा पैसा नगरसेवकांच्या विभागासाठी न वापरता इतर कामांसाठी वळवला आहे,खोके सरकारमुळे पाच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. पंचनामे झाले नाही. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक व्हावी लागते तीही झाली नाही. तरीही खोके सरकार राजकारणावर फोकस आणत आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी ही त्यांच्यासाठी असेल आमच्यासाठी ही कर्मभूमी आहे. गेल्या तीन महिन्यात मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट बंद झाले, नवे किती सुरु झालेत ? चांगले काम करणारे अधिकारी आहेत. त्यांच्या 90 दिवसात 6 बदल्या झाल्या आहेत. काहींच्या तर 24 तासात बदल्या करण्यात आल्या. प्रशासनात इतक्या तडकफडकी बदल्या होत नाहीत. एवढ्या गोंधळ का होताय? कोणाच्या आदेशाने सगळं हे होताय? यामध्ये खच्चीकरण मुंबईचं होते आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com