भाजप लोकांचा पैसा ओरबाडून उद्योगपतींना देतेय; राहुल गांधींचा हल्लाबोल
मुंबई : मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. यानंतर पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप लोकांचा पैसा ओरबाडून उद्योगपतींना देतेय. मोदी-अदानींचं नातं जगाला कळायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, या देशात उद्योगपती आणि पंतप्रधान यांच्यात साटेलोटे आहे. भाजप लोकांचा पैसा ओरबाडून उद्योगपतींना देतेय मोदी-अदानींचं नातं जगाला कळायला हवं.
जेव्हा मी लडाखला गेलो होतो, तेव्हा मी स्वतः तेथे चिनी लोकांना पाहिले होते. लडाखच्या स्थानिक लोकांनी मला सांगितले की पंतप्रधान चीनवर खोटे बोलत आहेत. चीनने आमची जमीन घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
या व्यासपीठावर उपस्थित असलेला पक्ष देशाच्या 60 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. ते एकत्र राहिले तर भाजपचा पराभव निश्चित आहे. आता भाजपला विजय मिळणे अशक्य आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आमच्यात मतभेद आहेत पण ते कमी करून दूर केले जात आहेत, असेही राहुल गांधींनी म्हंटले आहे.