टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती, पण पनवती...; राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती, पण पनवती...; राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. राजस्थानमधील जालोर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पनवती यावर भाष्य केले.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. राजस्थानमधील जालोर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पनवती यावर भाष्य केले. टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती. पण, पनवती सामना बघायला आल्यानं संघ हरला, असे राहुल गांधींनी म्हंटले आहे.

टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती, पण पनवती...; राहुल गांधींचा रोख कुणाकडे?
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेला विरोध नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

काय आहे राहुल गांधींचे वक्तव्य?

आपला संघ चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पणवतीने हरवून टाकलं, असं राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. टीव्हीवाले हे नाही सांगणार की (कोण पणवती), पण जनतेला माहितेय, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेळी राहुल गांधींनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, त्यांच्या या विधानाने जनसमुदायातून एकच हशा पिकला. यानंतर आता राहुल गांधींच्या विधानाचा रोख कुणाकडे? यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com