Rahul Gandhi | Aurangabad
Rahul Gandhi | AurangabadTeam Lokshahi

भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस; मात्र, राहुल गांधी असणार उद्या औरंगाबाद दौऱ्यावर

औरंगाबाद विमानतळावरून गुजरात येथील सभेला जाणार आहे. गुजरात मधील सभा झाल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादला परतणार

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. अशातच आजचा दिवस या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटचा दिवस असला तरी काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. त्यांचे थांबण्याचे कारण म्हणजे उद्या ते औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. 'राहुल गांधी उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असे आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या करण्यात आले आहे.

Rahul Gandhi | Aurangabad
फडणवीसांचा राज्यपालांना घरचा आहेर, आमच्या सर्वांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज

असा असणार राहुल गांधी यांचा उद्याच्या औरंगाबाद दौरा

राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने उद्या औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून गुजरात येथील सभेला जाणार आहे. गुजरात मधील सभा झाल्यानंतर ते पुन्हा औरंगाबादला परतणार आहे. पुढे औरंगाबाद विमानतळावरून ते खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com