Rahul Gandhi | Devendra Fadnavis
Rahul Gandhi | Devendra FadnavisTeam Lokshahi

राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानांचा फडणवीसांकडून समाचार; म्हणाले, सावरकरांचा स पण माहित नाही...

हिंगोलीमध्ये राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतात आणि आदित्य ठाकरे गळ्यात गळे घालतात.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी या यात्रेत स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हा वाद पेटत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहील गांधी यांच्या वक्तव्याच्या समाचार घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात 'हिंदुत्व' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. या परिसंवादात उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनीराहुल गांधींवर निशाणा साधला.

Rahul Gandhi | Devendra Fadnavis
संजय राऊतांना ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'काँग्रेसच्या वतीने सावरकरांबद्दल रोज खोटं बोललं जात आहे. स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या सर्वांचा मला आदर आहे. पण अत्याचार सहन करणारा सावरकारांसारखा एक नेता दाखवा. अंदमानमध्ये सावरकर गेले नसते, तर शेकडो कैद्यांनी आत्महत्या केली असती किंवा ते वेडे झाले असते. राहुल गांधी यांना सावरकरांचा स देखील माहीत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली.

'हिंदू समाज हा देशाचा आत्मा आहे. तो मजबूत झाला पाहिजे. सावरकर म्हणतात अनेकांना माझी मारलेली उडी लक्षात आहे. पण ती उडी लक्षात ठेवू नका. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जात मानली नाही. अनेक लोकांना बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार केले. जे सावरकरांना अपेक्षित होते, ते बाळासाहेब यांना होते. हिंदुत्व हे केवळ कर्मकांड नाही, ती एक व्यापक संकल्पना आहे. जे चांगले आहे, ती घेऊन जाणारी ही संस्कृती आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

Rahul Gandhi | Devendra Fadnavis
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाला बंदी घातली. मला वाईट एका गोष्टीचे वाटते की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अभिमान बाळासाहेब ठाकरे यांना होता. हिंगोलीमध्ये राहुल गांधी हे सावरकर यांच्याबद्दल इतकं वाईट बोलतात आणि आदित्य ठाकरे गळ्यात गळे घालतात. आमचे सोडा बाळासाहेब ठाकरे यांना स्वर्गात काय वाटलं असेल? असा सवाल फडणवीसांनी शिवसेनेला केला.

'तुम्ही आम्हाला शिव्या द्या, पण सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करतात. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब यांचे नाते सांगण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचार एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. जोपर्यत सावरकरांना अपमानित करणारे आहेत. त्यांना जमिनीत गाडल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com