सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला. यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला. यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय सत्याचा विजय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आणि या परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे आभार मानले.

सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा! आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

राहुल गांधी म्हणाले की, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा सत्याचा विजय होतोच. पण काहीही असो, माझा मार्ग मोकळा आहे. मला काय करायचे आहे, माझे काम काय आहे, सर्व काही माझ्या मनात स्पष्ट आहे. ज्यांनी आम्हाला मदत केली, जनतेने दिलेले प्रेम आणि पाठिंबा मी त्यांचे आभार मानतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मलिकार्जुन खर्गे यांनी म्हणाले की, हा केवळ राहुल गांधींचा विजय नाही, तर संपूर्ण भारतातील जनतेचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सध्या संविधान जिवंत आहे, न्याय मिळेल. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. लोकशाही आणि जनतेचा विजय झाला आहे. हा लोकशाहीचा विजय, संविधानाचा आणि सत्यमेव जयतेच्या ब्रीदवाक्याचा विजय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com