उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांची रांग काही कमी होत नाही आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांची रांग काही कमी होत नाही आहे. राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश करताच आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी मनीषा कायंदे, निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला.

आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. चिंचवडचे राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह राहुल कलाटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे.2014 च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. 2002 साली राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com