...तर 16 आमदारांचा अपात्रतेचा पंधरा दिवसात निर्णय होईल; राहुल नार्वेकरांचे मोठे विधान

...तर 16 आमदारांचा अपात्रतेचा पंधरा दिवसात निर्णय होईल; राहुल नार्वेकरांचे मोठे विधान

महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधासभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

मुंबई : महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधासभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. अशातच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन दौऱ्यावरुन महाराष्ट्रात परतले आहेत. आरोपांना घाबरुन निर्णय घेणार नाही. तर, नियम आणि घटनेतील तरतूदींनुसारच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाहीतर दबावाखाली निर्णय घेतला अशी चर्चा होईल, असा टोलाही नार्वेकरांनी विरोधकांना लगावला आहे.

...तर 16 आमदारांचा अपात्रतेचा पंधरा दिवसात निर्णय होईल; राहुल नार्वेकरांचे मोठे विधान
केवळ मविआ नाही तर...; अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

माझा लंडन दौरा व्यवस्थित पार पडला. मी उशिराही नाही आणि लवकरही नाही वेळेत आलो आहे. 16 आमदारांबाबत निर्णय लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न असेल. याचिका दाखल झाल्यापासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजकीय पक्ष कोणता आणि व्हीप या संदर्भात न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे. कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे राहुल नार्वेकरांनी म्हंटले आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर माझ्याकडे निर्णय आला तर मी सगळ्यांना अपात्र करेन, असं नरहरी झिरवळ बोलले होते. यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, उपाध्यक्षांकडे काय अधिकार असतात ते त्यांना माहित आहे. अध्यक्ष पद रिकामे असेल तरच उपाध्यक्षांकडे निर्णयाचा अधिकार असतात, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मला माझा अधिकार माहिती आहे. प्रक्रिया लवकर झाले तर पंधरा दिवसात निर्णय होईल. प्रक्रिया लांबवली तर निकालही पुढे जाईल. सभागृहाचा माझावर विश्वास असल्याने मी या पदावर आहे. मी संविधानाच्या अधिकारात राहून निर्णय घेईल त्यामुळे निश्चित राहावे, असेही राहुल नार्वेकरांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com