राजकारण
राज ठाकरेंचा आंदोलक मनोज जरांगे-पाटलांशी फोनवरून संवाद, म्हणाले...
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. यासोबतच राज ठाकरेंनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे.
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. अशातच, आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. यासोबतच राज ठाकरेंनी जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे.