राज ठाकरेंची बालमैत्रीण कोण? पाहा फोटो
निसार शेख, चिपळूण: डॉक्टर सुष्मिता दीपक विखारे या राज ठाकरे यांच्या बालमैत्रिणींपैकी एक आहेत. कोकणात चिपळूण येथेच वास्तव्य असलेल्या डॉक्टर सुष्मिता विखारे या राज ठाकरे यांना भेटण्यासाठी खास चिपळूण येथे नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटनाच्या प्रसंगी आल्या होत्या. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खास कोकणातले काजूही भेट दिले. यावेळी दोघांमध्ये गप्पाही झाल्या.
इतकेच नव्हे तर सुष्मिता यांनी राज यांना भोजनाचे आमंत्रण दिले मात्र यावेळी त्यांना वेळ नसल्याने त्यांनी आपण पुढील वेळी नक्की येऊ असेही आपल्या बाल मैत्रिणीला सांगितल. राज साहेब ठाकरेंबरोबर त्या पहिली ते दहावी 1983 च्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत.
या भेटीनंतर डॉक्टर सुष्मिता विखारे यांनी सांगितले की, राज ठाकरे या सगळ्या ग्रुपला मित्र-मैत्रिणींना नेहमीच भेटतात. मात्र यावेळी आमच्या कोणत्याही राजकीय गप्पा राजकीय चर्चा होत नाहीत. राज ठाकरे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गर्दीचा नेहमीच गराडा असतो त्यांना भेटण्यासाठी नेहमीच अनेकांना उत्सुकता असते. मात्र अशा व्यस्त कार्यक्रमातूनही राज ठाकरे आपल्या शालेय जीवनातील बालमित्र मैत्रिणीसाठी नेहमीच वेळ काढतात.