भाजपनं टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी उघडलीयं का? राज ठाकरेंचा खोचक सवाल
ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. यावरुन राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. तर, राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपनं टूर्स अँड ट्रॅव्हर्ल्स कंपनी सुरु केलीय का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं भाजपने सुरु केलीय का? राम मंदिराच्या दर्शनाची आमिषं काय दाखवताय? राम मंदिराच मोफत दर्शनाच आमिष दाखवून कसल्या निवडणुका लढवता, असा सवाल राज ठाकरेंनी भाजपला केला आहे.
सण कसे करायचे, फटाके केव्हा फोडायचे हे कोर्ट ठरवतंय. पण त्याच पालन होतंय कि नाही यावर लक्ष कोणाचं नाही. मराठी पाट्यांबद्दल न्यायालयाने आदेश दिले पण अजून देखील त्याचे पालन होतांना दिसत नाही. सरकार सुद्धा काही करत नाहीये. सरकार फारसं उत्सुक नसल्यानं मनसेलाच मराठी पाट्यांसाठी हातपाय हलवावे लागतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान, ओबीसी विरुद्ध मराठा वादाचं खापर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर फोडलं आहे. दुसऱ्या जातीचा विद्वेष करण्याची वृत्ती राष्ट्रवादीच्या उदयानंतर सुरु झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, हे जरांगे पाटीलच आहेत कि त्यांच्या मागे आणखीन कोण आहे ते येणाऱ्या काळात कळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे. 25 डिसेंबरला जारंगे काय सॅन्टा क्लॉज बनून येणार आहेत का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.