पैसा येतो जातो, पण नाव गेले तर...; राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला

पैसा येतो जातो, पण नाव गेले तर...; राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला

निवडणूक आयोगाने आज ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

मुंबई : निवडणूक आयोगाने आज ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. यामुळे शिंदे गटात मोठा आनंद साजरा करण्यात येत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

पैसा येतो जातो, पण नाव गेले तर...; राज ठाकरेंचा उध्दव ठाकरेंना टोला
उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला

काय म्हणाले राज ठाकरे?

नाव आणि पैसा. पैसा येतो, जातो. पुन्हा येतो. पण, नाव गेले तर पुन्हा येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजरात सुध्दा मिळायचं नाही. म्हणून नावाला जपा. नाव मोठं करा, अशा आशयाचा बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ राज ठाकरेंनी ट्विट केला आहे. सोबतच बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी व आम्ही घेतलेल्या निर्णायाशी एकरुप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवरील आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com