महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणूक आयोगाने...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणूक आयोगाने...

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तर, उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने स्थिती पूर्ववत करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हंटले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निवडणूक आयोगाने...
Ajit Pawar on Sushma Andhare : 'पवारांसमोर रडण्यापेक्षा ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य झाले असते'

आगामी विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मीरा-भाईंदर मध्ये पदाधिकाऱ्यांना भेट देऊन येणाऱ्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्व प्रोसेस चुकली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधीमंडळातला गट हा पक्ष समजला जाणार नाही. बाहेरचा जो आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल, असे न्यायालयाने म्हंटले आहे.

परंतु, आता या गोष्टींनंतर निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह त्या गटाकडे दिलेले आहे. त्यांचं काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा संभ्रमात टाकणारा आहे. ज्यावेळेला सर्व धूळ खाली बसेल तेव्हा समजेल नक्की काय झालं आहे, असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.

दरम्यान, राजीनाम्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीबाबत उध्दव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली होती. माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून मी घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com