धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले...

धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांवर राज ठाकरे संतापले; म्हणाले...

विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया

पुणे : पावसाळी अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहिला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने येत धक्काबुक्की झाली. यावर स्तरावरुन टीका करण्यात येत आहे. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का, असा सवाल त्यांनी धक्काबुक्की करणाऱ्या आमदारांना केला आहे.

महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

मनसेच्या शहर कार्यालयास राज ठाकरेंनी भेट दिली असून यावेळी त्यांच्या हस्ते सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात केली आहे. मनसे सभासद नोंदणीच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. यानंतर राज ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत ज्या नोंदण्या झाल्या त्या मुंबईत झाल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक पक्षाला दर ३ ते ४ वर्षांनी नोंदणी करावी लागते. या आधीची नोंदणी लॉकडाउनच्या अगोदर झाली होती. माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जे सभासद होतील त्यांना पक्षाकडून दर आठवड्याला त्यांच्या मोबाईल फोनवर अपडेट मिळत जातील. माझी भाषण, पक्षाच्या सूचना या सर्व मिळतील. मी स्वतः आज पुण्यात सभासद नोंदणी केली. मला सभासद करून घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे आभार मानतो, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com