'संभाजीनगरच्या आधुनिक सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार'

'संभाजीनगरच्या आधुनिक सजाकारांचा बंदोबस्त मनसे करणार'

राज ठाकरेंचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पत्र

मुंबई : मराठवाडा मुक्ती दिनावरुन राज्यात पुन्हा शिवसेना व शिंदे सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुले पत्र लिहीले आहे. यात संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजाकार पण येऊन बसलेत. लवकरच मनसे त्याचा बंदोबस्त करेल, असे त्यांनी पत्रात म्हंटले आहे.

हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे याांनी म्हंटले आहे.

मला असं एक नेहमी वाटतं, ह्या इतक्या मोठ्या लक्ष्याबद्दल आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. म्हणूनच आता जे नव शिक्षण धोरण येतंय, त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठयपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बरं, संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीयेत तर आधुनिक सजाकार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगर महापालिकेत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजाकार अर्थात लवकरच महाराष्ट्र निर्माण सेना रझाकार आणि सजाकार ह्या दोघांचा बंदोबस्त करेल. असो आजच्या दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा आणि माझं मराठी जनतेला आवाहन की तुम्ही जो लढा दिलात तो देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील लढा आहे त्यावर ऊ देऊ नका आधुनिक विरोधातील यात हा इतिहास आपल्याला बळ देणार आहे, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटले आहे.

दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा आता वादाचा विषय बनला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहणाच्या वेळेत बदल करून तो नऊ वाजेऐवजी सात वाजता ठेवला. यावर विरोधी नेत्यांनी यांनी जोरदार टीका केली. तर, सकाळी नऊ वाजताच पुन्हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे शिवसेनेने साजरा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com