राजकारण
पुण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पहिला धक्का
पुण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पहिला धक्का मिळाला आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाला पहिला धक्का मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांनी शिवसेना उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या प्रचार प्रसारची त्यांच्यावर जबाबदारी होती. कोणाच्या ही बंधनात काम करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे.