Ram Kadam
Ram Kadam Team Lokshahi

मतदारसंघातील नागरिकांसाठी भाजप आमदार कदम यांची अनोखी प्रतिज्ञा; पाणी मिळेपर्यंत केस कापणार नाही...

मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांसाठी प्रतिज्ञा

नेहमी वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असणारे भाजप आमदार आता पुन्हा एकदा नव्या विषयावरून चर्चेत आले आहे. यावेळी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी एक अनोखी शपथ घेतली आहे. मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, अशी शपथ राम कदम यांनी घेतली आहे.

Ram Kadam
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी होणार? अजित पवारांनी दिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला

मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, असे ट्वीट त्यांनी केले आहे. या ट्वीटसोबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना देखील टॅग केले आहे.

घाटकोपर परिसरातील डोंगराळ भागात पाणी पुरवठा होत नसल्याने स्थानिक भाजपा आमदार राम कदम यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही अशी अनोखी प्रतिज्ञा राम कदम यांनी घेतली आहे. पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिका अधिकाऱ्यांसोबत सातत्याने ते बैठका घेत आहेत. त्यामुळे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लागणार का? आणि भाजपा आमदार राम कदम हे केस कटिंग करणार का? अशा विविध प्रश्न आता चर्चेला आले आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com