संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीप्रमाणे : भाजप

संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीप्रमाणे : भाजप

संजय राऊतांच्या पंतप्रधान पदाच्या विधानावरुन भाजपचे टीकास्त्र

विकास माने | बीड : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी बदडल्या प्रमाणे झालं असल्याची टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकीप्रमाणे : भाजप
पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या; संजय राऊतांचे शिंदेंना आव्हान

संजय राऊत यांचं राजकारण डबल ढोलकी बदडल्याप्रमाणे झालं आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा यूपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावं असं राऊत म्हणत होते. मध्यंतरी राहुल गांधी यांनी करावं असे सुचवलं. मात्र, आता राहुल गांधी बॅकफुटवर असून त्यांच्या जागी उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं, असं सूचक वक्तव्य राऊतांनी केले आहे. एवढंच नाही तर ठाकरे दिल्लीला राहायला जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी राऊतांपासून सावध राहावं, अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या विधानवर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनीही टीका केली आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी चेहरा असतील तर हे शरद पवारांना विचारलं आहे का? निवडणुकीत आता मोदींचा फोटो नसणार आहे. स्वतःचा आणि पवारांचा फोटो लावावा लागेल. पवारांचा सल्ला घेतला का? दिल्लीला जाणार आम्हाला आनंद आहे, कधी बाहेर पडले का, असे खोचक प्रश्न देसाईंनी विचारले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com