ठाकरे बंधू, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

ठाकरे बंधू, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राजकीय वर्तुळात मोठा वाद पाहायला मिळला होता. अशातच, आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे समोर येते आहे.

मुंबई : राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन राजकीय वर्तुळात मोठा वाद पाहायला मिळला होता. अशातच, आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याचे समोर येते आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या या नावाने निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यात उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

ठाकरे बंधू, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
VBA Tweet : वंचितसंदर्भातच्या 'त्या' ट्विटमध्ये पटोलेंचं नाव, पटोलेंची प्रतिक्रिया काय?

अयोध्या प्रभू श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मुंबईतील मोठ्या राजकीय नेत्यांना देण्यात आलं. यामध्ये ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. श्री राम मंदिर न्यासकडून हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.

सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या मुंबईत व्हीव्हीआयपी यादीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यासोबतच विश्व हिंदू परिषदेकडून अनेकांना निवासस्थानी जाऊन निमंत्रण दिल जातं आहे. तर, राज ठाकरे, प्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांना कुरिअरद्वारे निमंत्रण पाठवल्याची माहिती मिळत आहे. श्रीराम मंदिर न्यास आयोध्या यांच्याकडून हे निमंत्रण पाठवण्यात आलं असून लवकरच निमंत्रण पक्षप्रमुख आणि पक्ष अध्यक्ष यांना प्राप्त होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com