Ramdas Athawale
Ramdas Athawale Team Lokshahi

मनसेसोबत युती केल्यास भाजपचा तोटा- रामदास आठवले

काही दिवसांपासून होणाऱ्या मनसे-भाजप युतीचा चर्चावर आठवलेचा सल्ला

अमजद खान|कल्याण : राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. मुंबई महानगरपालिका शिवसेनाचा बाल्लेकिल्ला असल्यामुळे भाजप विजयासाठी पूर्ण प्रयत्न यावेळी करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांच्या राज ठाकरे सोबतच्या भेटीमुळे युती होणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत. यावर आता रामदास आठवले यांनी भाजपला सल्ला दिला आहे.

Ramdas Athawale
खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची, दसरा मेळावाही मुख्यमंत्र्यांचाच - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

यावेळी केंद्रीय मंत्री आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटण्यास काही हरकत नाही मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचे अजिबात आवश्यकता नाही , रिपब्लिकन पक्षाचा भाजपसोबत आहे एकनाथ शिंदेंचा गट हा भाजप सोबत आलेला आहे, मागच्या वेळेला बीजेपी आणि आरपीआय एकत्र असताना मुंबईत 82 जागा निवडून आणल्या होत्या ,यंदा देखील 114 जागा निवडून येण्यात काही अडचण येणार नाही, राज ठाकरेंना घेतलं तर भाजपचा नुकसान होऊ शकते, उत्तर भारतीय, गुजराती ,दक्षिण भारतीय मतं मिळणार नाहीत. त्यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. रिपब्लिकन पक्ष ताकतीने भाजपच्या पाठीमागे उभा आहे ,राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com