हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर; आठवलेंची खास कविता

हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर; आठवलेंची खास कविता

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानावरुन रामदास आठवलेंची खास कविता

कमलाकर बिरादार | नांदेड : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरुन संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. ते नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर; आठवलेंची खास कविता
आम्ही कधीही फुटलो नाही, त्याच पक्षात आहोत; सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद

कोण चोर आहे, कोण जेलमध्ये जाऊन आले ते सगळ्यांना माहित आहे. हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर. 40 आमदार हिम्मतवाले आहेत, खरी शिवसेना त्यांचीच आहे, असे म्हणत आठवलेंनी न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

जोगेंद्र कवाडे शिंदे गटात आले. पण, महायुतीत सामील करताना चर्चा होणे अपेक्षित होतं. राज ठाकरेंना महायुतीत घेण्यास आमचा विरोध आहे. मी इथे असताना त्यांची गरज नाही. जास्त गर्दी करून उपयोग नाही, असेही त्यांना म्हंटले आहे.

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितचा ठाकरे गटाला फायदा होणार नाही. मुंबईत आम्ही ताकदवान आहोत. मुंबई महापालिका भाजपा जिंकेल. आमचा अडीच वर्ष उपमहापौर होईल, असे ठरल्याचे आठवले यांनी दावा केला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्याविरोधात विशेष अधिकार भंगाची सूचना उपस्थित केली आहे. अतुल भातखळकर यांनी नोटीस दिली आहे. यावर दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. उद्या दोन्ही नोटीसवर उपसभापती निर्णय घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com