सदानंद कदमांना अनिल परबांनी फसवलं, आत टाकायचे तर...: रामदास कदम

सदानंद कदमांना अनिल परबांनी फसवलं, आत टाकायचे तर...: रामदास कदम

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी सदानंद कदमांना ही अटक करण्यात आली होती.

मुंबई : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी सदानंद कदमांना ही अटक करण्यात आली होती. यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ईडी कारवाईमागे रामदास कदमांचा हात असल्याचा आरोप केला होता. यावर आज रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदानंद कदम यांना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी फसवलं आहे, अशी टीका रामदास कदमांनी केला आहे.

सदानंद कदम यांच्यावरती ईडीची जी कार्यवाही झाली त्याच्यामध्ये माझा हात नाही. पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम हे रामदास कदम करत नाहीत. ईडी माझ ऐकणार असती तर सर्वात पहिल्यांदा अनिल परब यांना आत टाकायला सांगितलं असते. अनिल परब यांनी सदानंद कदम यांना फसवलं आहे, अशी जोरदार टीका रामदास कदमांनी केली आङे,

दरम्यान, रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाई मागे एक लाख एक टक्के रामदास कदम यांचाच हात असावा. कारण खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी वरिष्ठांना सांगून सदानंद कदम यांच्याविरोधात कारवाई घडवून आणली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com