कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही - रामदास कदम

कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही - रामदास कदम

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता.

खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि पक्ष गेल्यानंतर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. आमचा पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. माझ्या वडिलांचं नावही चोरलं. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचं नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्याशिवाय आता मोदींनाही मते मिळत नाहीत. असे उद्धव ठाकरेंनी शिवसेनासह भाजपवर जोरदार निशाणा साधत टीका केली.

याच पार्श्वभूमीवर आज रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रामदास कदम म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना हासडायची भाषा ठाकरेंना शोभत नाही. खेडचा विकास मी केलाय ते ठाकरेंना माहित नाही. 100 वेळा खेडमध्ये आलात तरी तुम्ही योगश कदम यांना पाडू शकत नाही. असे रामदास कदम म्हणाले.

यासोबत ते पुढे म्हणाले की, मला संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या सभेला मुंबई, ठाण्यातून लोक आणली. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला बाहेरून माणसं आली होती. त्यांच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन. माझ्या नादाला लागू नका, शिवसेना आमची आहे. बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. भ्रष्टाचारी हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही. धनुष्यबाण सगळ्यांचाच हातात येत नाही. वडिलांच्या विचारांची बेईमानी तुम्ही केली. असे रामदास कदम म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com