Ramdev Baba | Amruta Fadnavis
Ramdev Baba | Amruta FadnavisTeam Lokshahi

अमृता फडणवीस आणखी 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत- रामदेव बाबा

याच कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता.

ठाण्यातील आज एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबांनी उपस्थिती नागरिकांना योगाचे धडे दिले. मात्र, या कार्यक्रमात रामदेव बाबांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी अमृता फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळले आहे. अमृता फडणवीस आणखी 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, असे रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

Ramdev Baba | Amruta Fadnavis
काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात; रामदेव बाबांचे खळबळजनक वक्तव्य

नेमकं काय म्हणाले रामदेव बाबा?

अमृता फडणवीस यांचे कौतुक करताना रामदेव बाबा म्हणाले की, अमृता फडणवीस आणखी 100 वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, तसंच अमृता फडणवीस या अनेक वर्षे तरुण राहतील, यामागचं कारणही रामदेव बाबा यांनी सांगितलं. अमृता फडणवीस यांना तरुण राहण्याची प्रचंड इच्छा आहे. त्या नेहमीच मोजून मापून खातात. खुश राहतात. लहान मुलासारखं हसत असतात… त्यामुळे त्या तरुणच राहतील, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केले आहे.

याच कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे रामदेव बाबांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, कार्यक्रमात महिलांना साड्या नेसायला वेळ नाही मिळाला. काही हरकत नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे बोलताना रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला ड्रेस (सलवार सूट) मध्ये सुद्धा चांगल्या दिसतात. अमृता फडणवीस यांच्या सारखा चांगल्या वाटतात. आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे रामदेव बाबा यावेळी म्हणाले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com