Ravi Rana | Navneet Rana
Ravi Rana | Navneet Rana Tema lokshahi

मेळघाटात रवी राणांनी वाजवला ढोल; तर, नवनीत राणांनी धरला तालावर ठेका

आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांचा 5 दिवसीय मेळघाट होळी दौरा आहेत
Published by :
Sagar Pradhan

आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांचा 5 दिवसीय मेळघाट होळी दौरा आहेत. मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. ते आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राणा दाम्पत्य गेल्या 12 वर्षांपासून होळी ही आदिवासी भागात साजरी करतात. त्यामुळे यंदाही ते त्याठिकाणी गेले आहेत. यावेळी आदिवासी लोकांच्या जीवनाशी समरस होताना नवनीत राणा दिसत आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या आदिवासी वाद्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये स्वतःहा रवी राणा ढोल वाजवत असल्याचे दिसून आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com