Ravindra Chavan Letter To MNS : रवींद्र चव्हाणांचा मनसेला संतप्त सवाल

मनसेच्या टोलनाका प्रकरणावरुन पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसेला पत्रातून सवाल केले आहेत. मनसेच्या टोलनाका प्रकरणावरुन पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करतो? असा संतप्त सवाल रवींद्र चव्हाण यांनी पत्रातून विचारला आहे.

सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड विनाशकारी मानसिकता असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. दगड भिरकवणारी नव्हे तर रचणारी तरुणाईची साथ हवी असे आव्हान त्यांनी पत्रातून केली आहे. “दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला तर विध्वंस होतो. याची कोणीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. तर आता यावर मनसे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com