राजकारण
नरेंद्र मोदी इंडियाचे नाही तर, भारताचे पंतप्रधान; सरकारी पुस्तिकेत उल्लेख
विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या आघाडीचे 'इंडिया' ('I.N.D.I.A') असे नामकरण केलं आहे.
विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या विरोधात स्थापन केलेल्या आघाडीचे 'इंडिया' ('I.N.D.I.A') असे नामकरण केलं आहे. तेव्हापासून 'इंडिया' हा शब्द चर्चेत आहे. या आघाडीच्या नावावरून भाजप नेते विरोधकांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ASEAN-India परिषदेसाठी आज रवाना होणार आहेत. या परिषदेच्या सरकारी पुस्तिकेत प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असे लिहिण्यात आले आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली. राष्ट्रपतीभवनातून पाठवलेल्या निमंत्रणपत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे.