Ritesh Deshmukh
Ritesh Deshmukh Team Lokshahi

भारत जोडो यात्रेतील रितेशने केला खास फोटो शेअर; लोक म्हणतायत, तू का...

या फोटोमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो काही काँग्रेस कार्यकर्ते हातात धरलेले दिसत आहेत

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. रितेश देशमुख अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर करताना दिसतो. मात्र, यावेळी त्यांनी महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमधला एक खास फोटो शेअर केला आहे.

काँग्रेसचे नेते रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, रितेश अजूनही वडिलांची तितकीच आठवण करतो. तो नियमीत आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट शेअर करताना दिसतो. भारत जोडो यात्रेवरून रितेश देशमुख यांच्यावर टीका होत असताना, या यात्रेतील फोटोमुळे नागरिक आता त्याला प्रश्न विचारत आहेत.

रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये विलासराव देशमुख यांचा फोटो काही काँग्रेस कार्यकर्ते हातात धरलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे रितेश शेअर केलेला फोटो 'भारत जोडो' यात्रेतील आहे. रितेशने हा फोटो शेअर केल्यावर लोक त्याला विचारू लागले की तो 'भारत जोडो' यात्रेत सहभागी का झाला नाही? अश्या अनेक कंमेंट लोकांनी त्या फोटोवर केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com