Prabhakar Patil | Rohit Patil
Prabhakar Patil | Rohit PatilTeam Lokshahi

...तर आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत; आबा-काकानंतर दोन ज्युनिअरमध्ये नवा संघर्ष

रोहित पाटील-प्रभाकर पाटील यांची भाषणातून एकमेकावर जोरदार टीका

संजय देसाई | सांगली : खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी नागज येथे भाषणात विरोधकांविरोधात फटकेबाजी केली होती. तर, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी मणेराजुरे येथे भाषणातून जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे मतदार संघात भावी आमदार म्हणून चर्चेत असलेल्या या युवा नेत्यांच्या जुगलबंदीने पुन्हा एकदा राजकीय संघर्षाची नांदी दिसून येत आहे.

Prabhakar Patil | Rohit Patil
हिंदू जन आक्रोश मोर्चेच्या मागण्यांची दखल सरकार नक्की घेईल : शिवेंद्रराजे भोसले

काही दिवसांपूर्वी नागज येथे एका गटाच्या कार्यक्रमात खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी जोरदार भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी गुंडगिरी करणाऱ्या विरोधकांना घरातून बाहेर पडू न देण्याचा इशारा दिला होता. तर, शुक्रवारी मनेराजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी देखील हाच धागा पकडत तुफान फटकेबाजी करून विरोधकांवर हल्लाबोल केला.

कोणी घराबाहेर पडू देणार नाही, असे म्हणत असेल, तर आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत. आबांच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे. असे म्हणून रोहित पाटील यांनी चांगलाच हल्लाबोल केला. या दोन्ही युवा नेत्यांची भाषण माझी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी मै हुं डॉन चे संगीत समाविष्ट करून या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com