सरकारचं आता अति होतंय; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले

सरकारचं आता अति होतंय; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण आता चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातूनही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण आता चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातूनही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

 सरकारचं आता अति होतंय; आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले
आव्हाडांवर गुन्हा दाखल! पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’...

कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यानी हा आरोप केला असून आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर रोहित पवार यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले आहे.

ते म्हणाले की, सरकारचं आता अति होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला. पण, सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकीय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको, रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, ठाण्यातही काही ठिकाणी रस्त्यावर जळालेले टायर टाकून वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com