राजकारण
...अन् रोहित पवारांनी उद्योगमंत्र्यांना अडवलं; काय घडलं नेमकं?
कर्जत जामखेड MIDC प्रश्नी रोहित पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट घेतली
मुंबई: कर्जत जामखेड MIDC प्रश्नी रोहित पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट घेतली. यासंबधी रोहित पवारांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
मंत्रीपद ग्रहण करताना कोणाबाबतही ममत्वभाव अथवा आकस बाळगणार नाही’, या घेतलेल्या शपथेनुसार माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांच्या भावनेचा विचार करुन कोणत्याही राजकीय शक्तीच्या अघोरी महत्त्वाकांक्षेच्या दबावाला बळी न पडता MIDC ची अधिसूचना काढण्याबाबतचं पत्र आणि एकाच दिवशी २५ हजाराहून अधिक नागरिकांनी केलेल्या सह्यांचं निवेदन उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिलं. याबाबत ते सकारात्मक भूमिका घेतील, अशी अपेक्षा आहे, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे.