बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात कोण उभं राहणार? रोहित पवारांनी सांगितले...
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा गेले. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीसाठी आता चर्चा रंगल्या आहेत. माध्यमांनी रोहित पवारांना सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत रोहित पवार म्हणाले की, बारामती विधानसभेवर फक्त अजितदादाच निवडून येऊ शकतात. दुसरं कुणी नाही, अजितदादा कुटूंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत.
तसेच बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार निवडणूक होणार नाही. लोकसभेला पण कुणी कितीही प्रचार केला तरी सुप्रिया सुळे निवडून येणार. अजितदादांनी केलेल्या कामावर दादाच निवडून येणार. असे रोहित पवार म्हणाले.