Rohit Pawar : फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी मराठा वाद निर्माण करत आहेत

Rohit Pawar : फडणवीस सत्तेतील लोकांना पुढे करून ओबीसी मराठा वाद निर्माण करत आहेत

दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबातील एका व्यक्तीला अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागत आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

दिवाळी पाडव्यानिमित्त प्रथमच पवार कुटुंबातील एका व्यक्तीला अशा पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी पाडवा साजरा करावा लागत आहे. परंतु मी संदीप क्षीरसागर यांना शब्द दिला होता. त्यानुसार मी कार्यकर्त्यांसोबत पाडवा साजरा करत आहे. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्मण करून राजकीय हेतू साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडमध्ये आमदार रोहित पवार माध्यमांना बोलत होते.

बीडमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जो प्रकार घडला त्यावेळी पोलीस हातावर हात ठेवून होते. अगदी साधा सायरन देखील त्यांनी वाजवला नाही. यामुळे यामागे जे लोक सहभागी आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याची चर्चा सर्वसामान्य मध्ये आहे. आम्हाला देखील तसाच संशय आहे. राष्ट्रवादी भवन हे मुद्दामून लक्ष केले गेले असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला. तसेच आरक्षण प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दामून ओबीसी नेत्यांना पुढे करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. वास्तविक पाहता जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी प्रश्न सोडवण्याची गरज आहे. अशा प्रकारे सभा घेऊन प्रश्न निर्माण करण्यात त्यांचा हेतू काय आहे असा सवाल आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.

पाडव्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार शरद पवार यांची भेट घेणार का या प्रश्नावर अजित पवार हे शरद पवार यांची भेट घेतात किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही ते भेट झाल्यावर सांगता येईल तर दुसरीकडे अजित पवार यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून कुटुंबातील व्यक्तीला भेटायला काय हरकत आहे असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com