अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागलेत, कदाचित...; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागलेत, कदाचित...; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिल आहे.

अहमदनगर : ओबीसी विरुद्ध मराठा वादाचं खापर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर फोडलं आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागले आहे, कदाचित लोकसभा निवडणुका जवळ आल्याने ते बोलत असतील, असा निशाणा रोहित पवारांनी राज ठाकरेंवर साधला आहे.

अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागलेत, कदाचित...; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी; बावनकुळेंचा घणाघात

रोहित पवार म्हणाले की, अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागले आहे, कदाचित लोकसभा निवडणुका जवळ आल्याने ते बोलत असतील. नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे जनतेचे महत्वाचे विषय बाजूला राहतात, असेही त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी एक मराठा लाख मराठा म्हणावे या राधाकृष्ण विखेंच्या आव्हानाला रोहित पवारांनी प्रतिप्रश्न केला आहे. राधाकृष्ण विखे ज्या विभागाचे मंत्री आहे त्या विभागातील दूधाचे दर कमी झाल्यात ते वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

महाराष्ट्रात जातं ही अनेकांना प्रिय आहे, प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून जाती-जातींमध्ये धोका निर्माण झाला, स्वतः च्या स्वार्थासाठी हे सर्व घडवलं जात. आमच्या पक्षात जातीवादाला थारा नाही. चांगला माणूस असेल तर मी जात पाहत नाही. राष्ट्रवादीच्या उदयानंतर सुरु झालेल्या द्वेषाचं रुपांतर आता ओबीसी विरुद्ध मराठा वादात झाले आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com