पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी 'पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे'! - रोहित पवार

पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी 'पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे'! - रोहित पवार

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या संघर्षावर मोठा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतीत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या संघर्षावर मोठा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबतीत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ पक्ष, चिन्ह अजित पवार गटाला मिळाला आहे. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले होते.अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली.

त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. या सर्व राजकीय घडामोडीवर शरद पवाक गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे असे रोहित पवार यांनी एक्स अकाऊंट पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते….

आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे!

#लडेंगे_और_जितेंगे! असे रोहित पवार म्हणाले.

या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com