कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावरच अनेक राजकीय मंडळींची प्रतिक्रिया येत आहे. अशातच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
मुंबईत गोवरने एक वर्षीय बालकाचा मृत्यू; महापालिकेकडून मृत्यू लपवण्याचा प्रयत्न?

कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यानी हा आरोप केला असून आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली असून निदर्शने करण्यात आली. तर, रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

रोहित पवार म्हणाले की, राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे. पण लक्षात ठेवा...कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही, असा निशाणा त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आणि भाजपाच्या पदाधिकारी रिदा रशीद यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर करत आव्हाड यांनी चारचौघांमध्ये आपल्याला अपमानित केल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांसमोर मला अपमानित केलं. 'तू इथं काय करतेस' असं माझा हात पकडून म्हटलं. मी एक महिला असून अशाप्रकारे महिलेचा सर्वासामोर आपमान करण्यात आला आहे. पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी रशीद यांनी केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी थेट राजीनाम्याची घोषणा केली आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com