Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यावर रोहित पवार यांनी ट्विट करत विरोधकांवर थेट हल्लाबोल केला आहे. रोहित पवार नेमकं ट्विटमध्ये काय म्हणाले ते पाहूया.

ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं, भाजपसारख्या महाशक्तीलाही पाणी पाजलं, सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री…. अजिंक्य योद्धा आदरणीय पवार साहेब!

अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या २२ दिवसात तब्बल ५२ सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं…. आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केला असतानाही हा योद्धा केवळ १ दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय…

हाती विचारांचं हत्यार घेऊन…

म्हणतात ना… योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही.

काही लोकांनी हाती #वस्तरा घेऊन तयार रहावं…. #मिशा_काढण्यासाठी

#साहेब

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com