Rohit Pawar: ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

Rohit Pawar: ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कन्नड साखर कारखाना बारामती अ‍ॅग्रोकडून खरेदी करण्यात आला होता. कारखाना खरेदीत गोलमाल झाल्याचा ईडीचा आरोप कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कन्नड साखर कारखाना बारामती अ‍ॅग्रोकडून खरेदी करण्यात आला होता. कारखाना खरेदीत गोलमाल झाल्याचा ईडीचा आरोप कन्नड सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांची बेकायदेशीर विक्री केल्याच्या प्रकरणात PMLA कायद्या अंतर्गत ईडीने 50.20 कोटींची एकूण संपत्ती जप्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं…. झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय.

ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई.. परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 साठीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडीने केलेली ही महाराष्ट्रातील मोठी कारवाई मानली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com